STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

मराठी...!

मराठी...!

1 min
215

मराठी माझी माय माऊली

आतवर तिची प्रेम सावली

जरी ती कधी कावली

तरी वाटते मला ती पावली


अर्था अनार्थाची मंदियाळी

द्विअर्थाची सदा दिवाळी

भाव भावनांची किरणे कोवळी

आनंदे नांदती सारी सोवळीओवळी


ही माऊली खरी लेकुरवाळी

लीलया खेळती शाहणी खुळी

हिच्याच पोटी जन्मली जुळी तीळी

स्वाद घेण्या हिच्या गोडीची पुरण पोळी


मानसन्मान जनमाणसातला हीचा

प्रत्येकाच्या हृदयात वसतो

म्हणून तर मराठीचा डंका

आजही जगी कानाकोपऱ्यात वाजतो


अशी भाषा ही जीला कधी

कुबडीचा आधार न लागतो

ध्वज समृद्धतेचा सदैव हीचा

तिन्ही लोकी गर्वाने फडकतो....!


Rate this content
Log in