मराठी सर्वस्व..!
मराठी सर्वस्व..!
1 min
536
मराठी उकार आहे,त्या नाकावरच्या नथनीचा
मराठी प्रियकराच्या उत्सुकतेचा होकार आहे
मराठी वेलांटी आहे,तिचा पदर आहे
मराठी दोन बंध जुळवणाऱ्या लग्नाचा गजर आहे
मराठी काना आहे,हिरकाणीच्या हिमतीचा कणा आहे
मराठी जिजाऊंच्या शिवबाचं बाणा आहे
मराठी अनुस्वार आहे,तिच्या माथ्याची शान आहे
मराठी गहिवरलेल्या बापाने केलेलं कन्येचं दान आहे...!
