मराठी राज्य.
मराठी राज्य.
ही मराठ्यांची भुमी, मराठी बोली
राजा आमुचा, शिवछत्रपती,
कड्या कपारा, छाती सह्याद्री,
हे राज्य आमुचे मराठी.
इंद्रायणीच्या तिरी
ही ज्ञानेश्वराची आळंदी,
देहू तुकारामांची,
विठ्ठल उभा विटेवरी,
ही पंढरपूर नगरी आमुची.
सुजल भुजल नद्या वाहती,
कृष्णा, गोदावरी कोयना,
ही चंद्रभागा पांडूरंगाची,
ही भू वारक-यांची.
कोल्हापूरची महालक्ष्मी,
तुळजा तुळजापूरची,
रेणुका डोंगरावरी,
उंच दत्तशिखरी,
ही भूमी परशुरामाची.
गर्द झाडी साग उंच उंच, किती,
फोडतो वाघ येथे डरकाळी,
गण गणात बोते,
गजानन बोला,चला शेगांवी.
हा मराठवाडा बोलतो मराठी,
वेरुळ अजिंठा कोरीव लेणी,
घृष्णेश्वरा नमन करु, औंढा नागनाथा,
परळीच्या वैद्यनाथा.
खानदेश आमुचा,
येथे मुक्ताई आमुची,
केळीच्या बागा येथे,
ही भूमी महाराष्ट्राची.
येथे आहेत रत्नांच्या खाणी,
रत्नाकराची कोकणपट्टी,
भाताचे तुरे लवलवती,
काजू बदाम आंबा हापुस किती,
श्रीफळ घेऊन, हा वृक्ष डौलतो,
ही मुंबई महाराष्ट्राची,
शान माझ्या भारताची.
अनेक पिके अनेक धान्य,
साडी नऊवारी डोईवरी,
फेटा धोतर अंगरखा खादी,
सह्याद्रीच्या पर्वतावर उभा,
महाराष्ट्राचा शेतकरी,
भाषा शुद्ध मराठी,
राजा आमुचा शिवछत्रपती.
