Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Bilgi

Others

4.9  

Pratibha Bilgi

Others

मराठी परंपरा : श्रावणोत्सव

मराठी परंपरा : श्रावणोत्सव

1 min
317


श्रावणमास हा किती बाई लहरी

कधी ऊन अन् मध्येच पावसाच्या सरी


ऊन-पावसाचा खेळ हा आगळा

श्रावणमासाचा रंग - ढंग हा भाबडा


गर्द हिरवा किती, किती पोपटी रंगछटा

सृष्टीने जणू नववधूचा, वेश धारण केला


सप्तरंगी इंद्रधनुष्याचे तोरण आकाशाला

अन् भिजल्या मातीचा सुगंध धरतीवर


मोराचा फुलतो डौलदार पिसारा

आव्हान देतो सर्वांस नृत्य नटायला


कणाकणातून धरतीच्या चैतन्य ओसंडला

फळा - फुलांनी वृक्ष, रानही बघ बहरला


श्रावणसरींच्या स्पर्शाने पिके आनंदाने डोलती

शेतकरी बांधवाचा चेहरा हर्षाने फुलती


लहान मुले ही पावसात चिंब भिजती

कागदी होड्या बनवून पाण्यात सोडती


सणासुदीला नवविवाहिता होते भावूक, हळवी

झुलताना झोका पाहून, ओढ लागते माहेराची


पूजा ही थाटात मांडते, मंगळागौरीची

मानाने ओटी भरती, सर्व सुवासिनींची


नटती, मुरडती, धावपळही न थकता करती

पतीचे नाव घेताना मात्र, लाजून उखाणे घालती


श्रावण सोमवारी होते, उपासना शंकराची

सत्यनारायणाच्या पूजेला, जोडही कथा पुराणांची


धार्मिक कार्यक्रमांचा वाहतो जणू पूर

दान देऊन गरिबांना, होतात पापे दूर


नागपंचमीला दूध - लाह्यांचा नैवेद्य लागतो

फुगडी, झिम्मा, कोंबडा, फेर असा मुलींचा खेळ रंगतो


सगळ्यात मोठा मान, रक्षाबंधनाचा

सण हा प्रेमाचा, बहिण - भावाच्या नात्याचा


वर्षभर वाट पाहत, बांधते राखी भाऊरायाला

मायेची ओवाळणी लाखमोलाची, मिळे बहिणीला


समुद्रकिनारी दरबार असे कोळी लोकांचा

नारळ अर्पण करूनी साजरी होते पौर्णिमा


नारळी भात आणि खमंग वड्या नारळाच्या

जणू कृतज्ञतेचा संकेत वाहती सागराला


गोकुळाष्टमीला बाळकृष्ण सुरेख सजला

बालगोपालांचा उत्साह ओसंडून वाहला


न विसरे कोणी कृष्णजन्माचा सोहळा

दहीहंडी फोडून केला गोपाळकाला


आला पोळा, केला बैलांचा शृंगार

गळ्यात घुंगरांच्या माळा, सजवली शिंगेही रंगांत


बेत पुरणपोळीचा, ठेवी बैलजोडीचा मान

पिठोरी अमावास्येला, निघे मिरवणूकही उत्साहात


असा हा राजा सर्व व्रतांचा, दिमाखात मिरवतो

श्रावणा, तू नाव आपलं वर्षानुवर्षे जोपासतो


Rate this content
Log in