STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

4  

Pratibha Bilgi

Others

मराठी मायबोली आपुली

मराठी मायबोली आपुली

1 min
112


पुण्यभूमी , महाराष्ट्र जिला म्हणती 

मराठी आहे मायबोली तिची 


असे छत्रपती शिवाजींची देण 

करावे तयांना त्रिवार वंदन 


ज्ञानेश्वरांची ओवी , तुकारामांचे अभंग

करती आजही जाणत्यांना मार्गदर्शन


कलाकारांनी समृद्ध अशी ही भूमी 

कवि कुसुमाग्रज पुरस्काराचे धनी


सरस्वतीचा लाभला वरदहस्त

मराठी साहित्य आहे जबरदस्त


लावणीला नसे कुठल्याच नृत्याची तोड

भजन , कीर्तन , गोंधळाला मिळे आध्यात्माची जोड


सावजीचा रस्सा अन् मिरचीचा ठेचा

वडा-पावला साथ देतो तिखट मिसळ हा खासा 


प्रांतासम बदलली जरी भाषा

पण स्वतःचा मूळ कधी ना सोडला 


सामावूनी कुशीत प्रत्येक परप्रांतीयाला 

मैत्रीचा आदर्श जगासमोर मांडला 


अशा या संस्कृतीची जितकी खोलावी शिदोरी

वैविध्यमयी माळ ज्ञानाची , जणू अनोखी सजली


मातीतील या जाणून घेऊयात मर्म

चला मराठी भाषेचा करूया सारे गर्व 



Rate this content
Log in