मराठी माझी
मराठी माझी
1 min
271
चिऊ काऊचा हात धरून आली
कधी मोराचे गाणे होऊन आली
शैशवातली आई झाली
मराठी..... मायबोली
शाळेतल्या पुस्तकांतूनी
गुरुजींच्या वाणीतूनी
विद्येच्या प्रांगणात
मराठी....सरस्वती
अलवारसे अलगूज
प्रेमात भिजलेले
सांगण्या अधरांवर
मराठी...... मैत्रिण
हळव्या मनांनी
थरथरत्या हातांनी
नातवंडे ज़ोजविता
मराठी.....साय सुखाची
व्यक्ततेच्या क्षणांत
अबोल भावनांत
आनंदाच्या उत्सवात
वेदनेच्या हुंकारात
प्रत्येक श्वासात
मराठी.... माझी
मराठी.....सखी
मराठी..... जननी
