Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

मराठी भाषा

मराठी भाषा

1 min
268


मातृभाषा आहे मराठी

सर्वांनी ती जोपासावी

तिचे जतन करण्यासाठी

साहित्याची आवड असावी  १


संस्कृतवरून आलेली

महती मराठी भाषेची 

राजभाषा होऊन आली

अभिमान आहे महाराष्ट्राची  २


आपले महान साहित्यिक

कुसुमाग्रज,वि.वा.शिरवाडकर

जन्मदिन त्यांचा साजरा करून

मराठी भाषा नेऊ यशोशिखरावर ३


मराठी भाषेला लाभला

इतिहास,शिवबाचा,पेशव्यांचा

थोर संतांनी पदस्पर्शही केला

नि वारसा लाभला साहित्यिकांचा ४


मराठी मातीच्या अंगणी

कृष्णा,गोदावरी नद्या वाहती

मातृभाषेच्या या प्रांगणी

सारे साहित्यिक सज्ज असती  ५


ओवी,गझल,हायकू,अष्टाक्षरी

मराठी भाषेच्या या धमन्या

ललित लेख,कविता,कथा, कादंबरी

बसले आहेत नाव उज्ज्वल करण्या ६


फक्त मराठी राजभाषा दिनी

कौतुक नको मातृभाषेचे

कायमचे सर्वांनी ठसवावे मनी

महत्त्व आपल्या मराठी भाषेचे ७


थोर साहित्यिकांचे योगदान

आणि पावन झालेली संतांची भूमी

या सर्वांनी बहरले मराठीचे पान

मग माय मराठीला काय बरे कमी? ८


मराठी मातृभाषा आपली

अवीट गोडीची आहे भारी

साहित्यिकांच्या लेखणीने बहरली

जगात उभी आहे अभिमानाने खरी ९


मराठी भाषेचे महत्त्व,विकास

गुणगान,संवर्धन करून वाढवूया

आज परदेशातही पोचली खास

अभिमानाने तिचा गौरव करूया १०


Rate this content
Log in