मराठी असे आमुची मायबोली
मराठी असे आमुची मायबोली
1 min
117
मराठी असे आमुची मायबोली
असली जरी रांगडी तरी लई भारी
भारदस्त आवाजात शिव्या आणि प्रेम
मनाला आतून हलवून टाकते
किती करावी तिची कौतुके
जरी असती अनेक भाषा
मराठी आमची,आमचीच भाषा
मिशीवर ताव मारून बोलली जाणारी
नाही मिळमिळीत, एकदम झुपकेदार
संतानी लिहीलेली, वाचलेली, गायलेली
मराठी आमची थोर मायबोली
बोलातून जाणवतो महाराष्ट्री तडका
वाकड्या नजरेने पाहिले तर उडतो भडका
तरीही ती प्रेमाची साज ल्यालेली
मराठी असे "माझी" मायबोली
