मराठी असे आमुची मायबोली
मराठी असे आमुची मायबोली
1 min
403
माय मराठी
साद मराठी
भाव मराठी
भावार्थ मराठी
बाज मराठी
बात मराठी
जगण्याचा अर्थ मराठी
ती कधी बोलते वृतात
कधी अलंकारात
ओव्या भारुडे
तिच्याच अंगणात
पाणी की हो भरी
इथेच वाणी तुक्याची
आणि वेद ज्ञानाचे वदती
इथल्याच मातीत
भाव मनीचे खोलते
मायबोली माझी मराठी
हीच खरी आत्मियता
नका सोडू तिचा हात
हीच असे आमुची नम्रता
उन सावल्या येतील न् जातीलही
कोंब जपा मराठीचे
ओंजळीत घ्या चार शब्द
अनुभवा त्या शब्दां शब्दांतला
अमृतालाही हिच्या पुढे
वाटेल कमीपणा त्यालाही
सात्त्विकतेच्या राशी इथेच
काय बोलले कोण बोलले
तिचं आमची मायबोली
