STORYMIRROR

Trupti Naware

Others

3  

Trupti Naware

Others

मराठी असे आमची मायबोली

मराठी असे आमची मायबोली

1 min
447

फक्त मराठी भाषा दिनासाठी

शुभेच्छा दिली जाते मराठी 

अन्यथा सगळीकडे आता असतात

Happy आणि Days

मराठी माणसालाच आहे जास्त 

ईंग्रजीचे craze,,,

औपचारिक झालीय नाती

Smart झालेय फोन

घरी, दारी, शाळा ,बाजारी

मातृभाषा विचारतयं कोण ?

पण आईला आईच म्हणा हो

बाबांना बाबा..

नका करु देवू इंग्रजी ला

मराठीवर ताबा..

तिला तरी कुठे कळतयं ती

खर्या अर्थाने आजच साजरी होते

CBSE_ICSE च्या सासुरवासात

मराठी परकी होते..

मनाच्या हुंदक्यात कधी

जपावी मराठी ..

निखळ हास्याच्या खळखळाटात 

शोधावी मराठी ..

शब्द ,विचार,श्वासात बोलकी असावी मराठी ..

ध्यानी ,मनी,स्वप्नी हसत असावी मराठी ..

मराठीचे मीपण असु द्यावे

अभिमानासाठी...

कवितेतच कां जुळाव्या

मराठीच्या रेशिमगाठी..

केवळ शुभेच्छा नकोत राजभाषेच्या

या एकाच दिवसासाठी...

जुळु द्या,,सुर मराठी चे

प्रत्येक मराठी मनात

३६५ दिवसांसाठी !!!!

 


Rate this content
Log in