मोठी बहिण
मोठी बहिण
कर्तव्यानेच नाही तर
तू ताई मनाने ही मोठी आहेस
आमच्या प्रत्येक सुख दुःखात
आई म्हणून झटली आहेस.......
आमच्या प्रत्येक सुख दुःखाचं
भार टाकतो तुझ्याच अंगावर
तुझ्याच आपुलकीची थाप आहे
ताई आमच्या जीवनावर ......
स्वतः पेक्षा जास्त आहे
तुला आमची काळजी
आमच्या संकटात कधीच
टाकली नाहीस आम्हास वाळवी ......
बहिण म्हणू की आई
पडली मी किंचित संभ्रमात
सतत व्यस्त असती तू
प्रामाणिक पणे तुझ्या कामात ......
बसून खाण्या पेक्षा
विश्वास आहे तुझं घामात
खरचं सुवर्ण म्हणावे ज्याला
ते आहे तुझ्याच नामात......
तुझी माया आणि आपुलकीची थाप
सदैव आमच्या पाठीवर राहू दे
ईश्वराकडे करते मी प्रार्थना
तुला अशीच सुखी जीवन देऊ दे.....
