STORYMIRROR

Goraksha Karanjkar

Others

3  

Goraksha Karanjkar

Others

मोरांची चिंचोली

मोरांची चिंचोली

1 min
252

चिंचेची आळी (ओळ), म्हणजेच चिंचोली


चिंचेच्या झाडांची घनदाट सावली, म्हणजेच चिंचोली

थंडगार वाऱ्याची अंगावर येणारी झुळूक, म्हणजेच चिंचोली


कानावर येणारा पक्षांचा आवाज, म्हणजेच चिंचोली

मोरांचे सुमधुर ओरडणे, म्हणजेच चिंचोली


पाहावे तिथे दिसतात नाचणारे मोर, म्हणजेच चिंचोली

गावाचे कुलदैवत खंडोबाचे सुंदर मंदिर, म्हणजेच चिंचोली


गावातील सलग्न राहणारे लोक, म्हणजेच चिंचोली

प्रत्येक सनाला एकत्र येणारे लोक, म्हणजेच चिंचोली


निसर्गाचे लेणे लाभलेली घनदाट झाडी, म्हणजेच चिंचोली

गावाच्या दोन्ही बाजूने असलेली तळी म्हणजेच चिंचोली


अशीही गुगल वर लगेचच सापडणारी, चिंचोली

अभिमान आहे आम्हा सर्वांना अशीही, मोरांची चिंचोली.....

मोरांची चिंचोली......

    


Rate this content
Log in