मोल कष्टाचे....
मोल कष्टाचे....
1 min
427
भाग्य आपुलेच
आपल्याच हाती
श्रमाची महती
जगी थोर
श्रमानेच होते
सर्व काही साध्य
नित्य राहू बाध्य
श्रमालाच
घामातुनी वाहे
श्रमाची संस्कृती
श्रमाची आरती
खरी पूजा
असाध्यही होती
श्रमाने साकार
श्रमाचा आकार
विश्वव्यापी
श्रमाची महती
वर्णिली संतानी
करावे सर्वानी
पारायणे
कष्टाची भाकर
खावी चतकोर
उगा उपकार
कश्यापायी
