मोगरा फुलला
मोगरा फुलला
1 min
309
पहाटे-पहाटे
मोगरा फुलला
सर्व अंगणीही
सुगंध दरवळला ||
पांढरी पांढरी
फुले निर्मळ
वेलीवर शोभला
मोगरा परिमळ ||
लांब गजरा
केसात माळला
सुहासिनीच्या त्या
डोळीवर शोभला ||
दिनभर उनात
निघतो होरपळून
सांजवेळी दरवळे
मोगरवेळी फुलून ||
सुहासीक सुगंधाने
रजनी मन प्रसन्न
चांदण्यात या रात्री
उधळून आठवण ||
