मोदीभाऊ
मोदीभाऊ
मोदी सरकारचे वरीस सरलं
भारताच नाणं जगात वाजलं
अमेरिकेच्या ओबामाला याव लागलं
मोदीभाऊ काय गारूड केलं
धरणीकंपान नेपाल हादरलं
प्रधानमंत्र्याच मन दुखावलं
भारताच्या मदतीनं नेपाल गहीवरलं
मोदीभाऊ काय गारूड केलं
आधीच्या १० वरीसात ९ कोट गाठलं
यान १० महिन्यात ४ कोट खातं उघडलं
भाऊ आम्ही भाषणही ठोकलं
मोदीभाऊ काय गारूड केलं
३३० रुपड्यात जनतेच विमा केलं
१२ रुपड्यात अपघातसंरक्षण भेटलं
कागदी घोड प्रत्यक्षात आणलं
मोदीभाऊ काय गारुड केलं
आर्थिक शिस्तीचं धडं गिरवलं
लोकप्रिय अर्थसंकल्प नाही दिलं
रेल्वेसंकल्पाच सर्वानी कौतुक केलं
मोदीभाऊ काय गारुड केलं
वरिसात भष्ट्राचाराचं नाव नाही आलं
चौफेर वारु शेतावर अडलं
भूसंपादनान नाव खराब झालं
मोदीभाऊ इथे जरा चुकल
