STORYMIRROR

Anagha Kamat

Others

3  

Anagha Kamat

Others

मोबाईलचं महत्त्व

मोबाईलचं महत्त्व

1 min
174

मोबाईलचं प्रत्येकाला लागलं आहे खूळ 

हातात लोकांच्या सकाळी, भरायच्या आधी चूळ 


मोबाईलमुळे लोकांना मिळत नाही हो वेळ 

फोन करा, मेसेज द्या नाहीतर घेऊन बसा खेळ 


आधी तर मुलं लपवूनच वापरत होती मोबाईल 

आता आॅनलाईन क्लासमुळे हातात त्यांच्या फाईल 


परीक्षा पण आता मोबाईलवरच पूर्ण करा 

मोबाईलवरच निकाल बघा, मोबाईलच हातात धरा 


मोबाईल आधी चैन होती, आता आहे गरज 

मोठ्यांपेक्षा छोटी मुलं वापरतात मोबाईल सहज 


मुलाबाळांना हल्ली नसतो वेळ, मोबाईलच हाती

लहान वृद्ध छोट्या-मोठ्यांची, मोबाईलवरच प्रिती 


मोबाईलमुळे राहतात बरी घट्ट नातीगोती

करा खरेदी आॅनलाईन हिरे, माणके, मोती


कपडे घ्या, वस्तू घ्या, स्वयंपाकघरातील भांडी घ्या 

सगळं काही मिळतं आॅनलाईन, फक्त तुम्ही पैसे द्या 


दूरदेशी राहणाऱ्यांकडे करता येतो संपर्क 

लोकलमध्ये, बसमध्ये लोक मोबाईल मध्ये गर्क 


फोन करा, फोटो काढा आॅडिओ व्हिडीओ रेकाॅर्ड करा 

खेळ खेळा, अभ्यास करा खरेदीसाठी पैसे भरा 


मोबाईलचे महत्त्व जाण बाळा, त्याच्या शिवाय अशक्य 

मोबाईल आहे ज्याच्या हाती, त्यांनाच सगळे शक्य


Rate this content
Log in