STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

मोबाईल

मोबाईल

1 min
244

आहेस तू छोटा बाळा।

तरी सगळ्यांशी लावशी लळा।

बोटाना सारखा चाळा

तुझ्यातच ज्ञानाची शाळा।

खाली तुला ठेवता

मॅसेज तू सांगता

घेते हातात पुन्हा

त्यात शुभेच्छांची प्रस्तावना।

आहेत तुझ्यात ज्ञानाचे भांडार

शब्दात शब्दाचा आहेर।

पण तुझ्यातच माझे 

सामावलेले असते सासर माहेर।

नसतांना जवळ तुझ्या 

हाका मज मारतो।

ओरडून ओरडून उचलून घ्याना मला सांगतो।

शाळा तुझ्यात आता online असते।

एवढे सगळे विद्यार्थी आणि विषय तुझ्यात सामावलेले दिसते।

पडलास बाळा जरी तू

नाही कधी रडत।

खरचटले तुला जरी तू तुझे

काम नाही टाळत।

मूल घरात असल्यामुळे त्यांना बोर तू होऊ दिले नाही।

गेम, शाळा, अभ्यास चालू ठेवले काही न काही।

मूर्ती लहान पण किर्ती महान ।

कोरोनाच्या काळात देखील तू

नातेवाईक जोडून ठेवले,

याचा आम्हाला सार्थ अभिमान


Rate this content
Log in