मनुष्या जन्म व्यर्थ नसावा
मनुष्या जन्म व्यर्थ नसावा
1 min
163
वृथा काळ चालला आहे तुझ्या जन्माचा..
परोपकार तुला कळला नसावा..
कशास फिरतो तू मागे मृगजळाच्या..
स्थितीचा कदाचित तू किंकर असावा...
दिसतो तुझ्याकडे वसा सरस्वतीचा..
कसा घास तुला कुबेराने दिला नसावा?
प्रासाद भव्य भारी रस्त्याच्या कडेला..
गरीबाघरी तू लावलेला दिवा असावा..
येत नाहीत कानावर चर्चा तुझ्या समाजसेवेच्या..
प्रसिद्धीचा हव्यास तुला जडला नसावा...
सुगावा लागला नाही तुझा मैफिलीला...
मला वाटते तू शापित गंधर्व असावा
