STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Others

3  

Pratiksha vaibhav Kulkarni

Others

मंत्र सुखी आयुष्याचा

मंत्र सुखी आयुष्याचा

1 min
442

ऊन सावली हे नियम निसर्गाचे

दोन्हीतही असे गणित मनुष्यजन्माचे

उन्हाने दिले जरी चटके दुःखाचे

सावलीने पांघरून घातले सुखाच्या थंडाव्याचे

यातच मिळे आनंद आयुष्याच्या वाटेवरचा

हाच आहे मंत्र सुखी सुंदर आयुष्याचा!!


मनुष्यजन्म ही निसर्गचीच देन ,उन्हाने सुरवात आणि सावलीने शेवट असे

कष्ट करून दिवस सरले ,उन्हाने चटकेही अमाप दिले

त्यातही असे आनंद वेगळा,किरण त्यात सुखाचा दिसे

घामाचेही मग होतात मोती,कष्टाचे मूल्य लाखमोल होते

यातच लपला आहे अर्थ लाखमोलाचा

हाच आहे मंत्र सुखी सुंदर आयुष्याचा।।


जीवन आहे सुंदर जरी कष्टास मात्र पर्याय नसे

तरी दुःखानंतर सुख हा तर सृष्टीचाच नियम असे

पर्याय नसला हातात जरी परिणाम मात्र हाती आहे

त्याच कष्टातून यशाचा मार्ग साधा व सुकर असे

यातूनच सापडे मार्ग यशाच्या वाटचालीचा

हाच आहे मंत्र सुखी सुंदर आयुष्याचा।।

हाच आहे मंत्र सुखी सुंदर आयुष्याचा।।



Rate this content
Log in