मनस्ताप
मनस्ताप

1 min

12K
मनस्ताप आहे मला
माझ्या या वागण्याचा
लोकांना नको तेवढे
महत्त्व उगीच देण्याचा
मनस्ताप आहे मला
माझ्या अशा बोलण्याचा
लोकांना नको तेवढे
समजून उगीच घेण्याचा
मनस्ताप आहे मला
माझ्या शांत बसण्याचा
लोकांचे नको तितके
चुकीचे सहन करण्याचा
मनस्ताप आहे मला
माझ्या भावनिक असण्याचा
स्वार्थी लोकांपुढे आपले
दु:ख व्यक्त करण्याचा