मनसोक्त बागडणे होई
मनसोक्त बागडणे होई
1 min
301
लहान मुलांची नाही आता शाळा
म्हणुनी मनसोक्त बागडणे होई
घरच्यांचा वेळ खेळण्यात जाई
नाही सकाळची आता शाळा घाई
सगळं कसं चाललं आहे मजेत
कुटुंबास लाभतो आहे सहवासाचा
लडिवाळ हरवलेला स्वच्छंदी छंद
शिक्षकही आता घेतात आस्वाद
मनमुराद सोबतीचा आपल्या मुलांचा
खुशीत सुट्ट्यांच्या नाचतात मुले
पाहून खुलतो चेहरा पालकांचा
मनसोक्त आता होई बागडणं
