STORYMIRROR

pooja thube

Others

4  

pooja thube

Others

मनसौंदर्य

मनसौंदर्य

1 min
405

सुंदर दिसावे

वाटे प्रत्येकाला 

खरी सुंदरता मनाची

कधी कळेल मानवाला


नश्वर या शरीरासाठी

फॅशन असते

लाखमोलाच्या मनासाठी

काहीच नसते


आजकाल माणसाची ओळख

कपड्यांवरून होते

सुंदर जरी मन त्याचे

फाटक्या कपड्यांखाली दडपते


फॅशनच्या नावाखाली 

हिंसा चाले शरीराची

महाग जितके कपडे तितकी 

सुंदरता त्या माणसाची 


रसायनांचा मारा करून

कोण सुंदर होतात

तरीही नैसर्गिक सौंदर्यासाठी 

लोक वेडे होतात 


जाणून घेतले पाहिजे

महत्त्व मनाचे

आणि जाणा महत्त्व

त्याच्या सौंदर्याचे


देही उंची वस्त्रे

कपटी मन असे 

हेवा मत्सर भिनलेला अंगी 

फॅशन रोमारोमात दिसे 


जाणून घे मानवा

महत्त्व सौंदर्याचे

सुंदरता चराचरात

सौंदर्य खास निसर्गाचे


सगळ्यात आवश्यक 

सुंदरता मनाची 

सौंदर्य असावे वागण्यात 

फॅशन ही जीवनाची 


Rate this content
Log in