मनपाखरू
मनपाखरू
आभाळ भरून आलया वरती
मनीचं मनपाखरू उडू लागलया
पावसाची मजा समदी न्यारीच
बेधुंदीत मनपाखरू नाचतया.....
कधी जातय गगनी उंच ,उंच
पक्षांबरोबर मुक्त विहारतयं
कधी सर्रकन वार्याची झुळूक होवून
दाही दिशातील सुगंध मस्त हुंगतयं....
कधी गुलाबाची टपोरी कळी होतयं
पाकळी पाकळी उमलून आनंदतयं
मनातल्या मनात पाऊसधारा होवून
अलगद धरेला कवटाळायला येतयं....
कधी मन अवखळ वारा बनतयं
हळूच फुलांचे चुंबन घेवून पसार होतयं
कधी खळखळणारी नदी मन होतयं
स्वतःबरोबर सर्वांचेच भलं करतयं......
कधी दाट वृक्षांची राई होवू पाहतयं
थकलेल्या भागलेल्यांना सावली देतयं
कधी धुंद फुलपाखरू मन होतयं
या फुलावरून त्या फुलावर मनसोक्त झुलतयं.....
