STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

मनोमिलन

मनोमिलन

1 min
235

मने केव्हा जुळतात 

मनोमिलन जेव्हा होते 

मनातले विचार मिळतात

आचाराने मन सजते....


आपल्या आचरणाने

इतरांची मने जिंकावीत

वाणीने शब्द सांभाळावेत

चांगली वर्तने करावीत....


संवाद वाढवावेत सदोदीत

नातेवाईंशी संपर्क करावा

सर्वांना सांभाळून घ्यावे

गुरूजनांचा आदर करावा.....


प्रेमाचे रोपटे लावून वाढवावे

आचरांचे लोणचे मुरवावे

बंधनं सामाजिकतेची पाळावीत

सर्वाच्या मताने नीट वागावे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन