मनोगत (पुस्तकाचे)
मनोगत (पुस्तकाचे)
बंद कपाटात रुसून होतो
वाटल माझी किंमत कमी होणार
मोबाईलच्या दुनियेत माझ्याकडे
आता कोण पाहणार?
मैत्रिणीच्या केसातला गुलाब
माझ्याजवळ जपून
हळूच तिच्या आठवणीत
आता कोण जाणार?
पिंपळाचे पान आता हरवले
मैदानात ते कोमेजून पडणार
त्याला नकळत स्पर्श करून
शहारे ऊठणे बंद होणार?
वाटल मला वाळवी लागली
ती मला गिळंकृत करणार
तितक्यात एका कोमल हाताने
अलगद मला बाहेर काढले.
तिचा कोमल स्पर्श होताच
मला नवजीवन मिळाले
हळूवार तिने फुंकर मारले
माझ्यात नवचैतन्य आले
हळूच तिने ओठ टेकवले
अभिनंदन तिने माझे केले
युग कितीही बदलले तरी
तूच माझा श्वास असेल
