STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

मनमिळाऊ व्यक्ती

मनमिळाऊ व्यक्ती

1 min
243

ज्यांचे विचार चांगले असतात 

तेथे ओळख जुनी लागतं नसते 

जुळतात जेथे निस्वार्थ नाती 

कायम तेथेच मन रमत असते......


ज्यांची मनं मोकळी असतात 

त्यांचे प्रत्येक गोष्टीवर नसते आक्षेप 

एकमेकांना समजून घेणे 

तयांसाठी हेच महत्वाचे गरूड झेप.....


प्रेम,आपुलकी,जिव्हाळ्यांने 

भक्कम असतात अशी नाती 

एकमेकांच्या सहकार्याने 

पिकवतात नित्य घामातून मोती......


अशा लोकांमध्ये कधीच 

दिसणार नाही मी पणाचा अहम 

अन् सुख असो वा दुख 

अशी लोकं वाटून घेतात सम......


हसा आणि हसवत रहा 

हे प्रेमळ,निःस्वार्थ लोकांचे तत्व 

अशा लोकांचा पैशाला नव्हे 

तर माणुसकीला जास्त महत्व.......


अशी लोकं अनोळखी नात्यांनाही 

लगेच आपलंस करुन घेतात 

कसलाही भेदभाव न बाळगता 

कुठेही क्षणार्धात स्मरस होतात .......


Rate this content
Log in