मनी च्या देवळीत लाव दिवा तिमिरात ही उजळणरा .
मनी च्या देवळीत लाव दिवा तिमिरात ही उजळणरा .
मनीच्या देवळीत लाव
दिवा तिमिरात ही उजळणरा..
आयुष्यात स्पर्धा आहे चालू,
तू का मी पहिला प्रश्न लागे वाढू.
येता वळण वरच घाट अवघड
वाटे संपले सारे इथेच जीवन .
भास ते ही आयुष्य होते ,
नसता कोणी ही जग हसू होते ..
भाव ते ही कठोर असतात
मनाला छळून नयनात जगत रहातात.
संपवावे सर्व काही थांबवावे वाटे
गती श्वासाची लय तरीही चालूच
आत्मा शिव शाश्वत असे
क्षण भंगुर असते भाव मनीचे हे ..
येतात वादळे तरंग लहरी सवे
होते उदार मन घेते झोके तयासवे
एक विश्वास जगवा मिळालेत
अनमोल क्षण ते जगावे खास
शरीर चा अन मनाचा असा
ठाव घेत जगणे आसवे खरे ..
मनाच्या ताब्यात आयुष्य नाही
मन आपल्या ताब्यात असावे खरे..
येता जाता हत्या आत्मा हत्या चा विचार कधी ही..
का आलो होतो या जगी आपण
करावा एकदा विचार हाही जरुर
झाले का ते कर्यभाग साध्य की नाही
मग ठरवावा निर्णय सारा..
मान्य आहे कठिण आहे सोपे काय ?
जीवनी काहिच नाही न
मग का संपण्याचा ध्यास जीवनी,
का होता उदास मन ,
घेतो निश्वासची हाता काठी,..
कर मन निग्रह जगण्याचा ..
आपणच होता गुरु मनाचा ..
नसे भासत काहिच अशक्य ,
कर मन निश्चय कर मात त्या नकारार्थी विचरावर,
तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
सांगत रहा मनाला नेहमी ..
कर दुर्लक्ष त्या वळणाला
जरा दे लक्ष दिसेल ही दुसरा मार्ग ..
असेच जीवन असते जगता येत नाही ,
पण जगणे भाग असते
अपल्या साठी जगणे होते संपते कर्यभाग मग ,
दुसरयासाठी जगणे देतो नेहमीच दुसरा मार्ग अपल्याला
विचर नाकारा नसतो च कधी
देतो तो ही आव्हान अपल्याला
निर्णय सांग ना तुझा तू त्या वादळ उठले त्याला ..
शमते ते वादळ ही
होते शान्त सारे वारे अशन्ततेचे..
मनीच्या देवळीत लाव
दिवा तिमिरात ही उजळणरा..
