STORYMIRROR

Suvarna Patukale

Others

3  

Suvarna Patukale

Others

मंगल मूर्ती मोरया

मंगल मूर्ती मोरया

1 min
261

मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया

कार्यारंभी प्रथम वंदीतो

गजानना श्री गणराया

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया


मोदक लाडू आवडती तुज

उंदीर वाहन तुझे असे

लंबोदर तू वक्रतुंड तू

शोभिवंत एकदंत दिसे

दर्शने तुझ्या दुःखही हरते

अज्ञान जातसे सर्व लया

कार्यारंभी प्रथम वंदीतो

गजानना श्री गणराया

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया


बुद्धीदाता भाग्यविधाता

सफल कामना तुजपाशी

दीनदयाळा शरण मी आलो

आलो तुझिया चरणासी

हे गजवदना गौरीनंदना

दाविसी भक्ता तूच दया

कार्यारंभी प्रथम वंदीतो

गजानना श्री गणराया

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया


मास भाद्रपद आस मनाची

वाढवितो येता तू घरी

आरास, आभूषण नटे मूर्ती

जयघोष दुमदुमे ही नगरी

हे परमेशा जाळून क्लेशा

भाव भक्तीचा जाणून घ्या

कार्यारंभी प्रथम वंदीतो

गजानना श्री गणराया

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया


Rate this content
Log in