STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

3  

Prashant Tribhuwan

Others

मनातला पाऊस

मनातला पाऊस

1 min
178

मनातला पाऊस मनातच बरा

बाहेर आला तर डोळे ओले होतील

पुन्हा एकदा मग विनाकारण ते

जुन्या आठवणींना उजाळा देतील


शांत जरी तो बाहेरून साऱ्यासाठी

आतल्या आत आजही तो बरसतो 

वाट पाहतो भेटीसाठी तो अजुनही 

सारे काही मनी साठवून तरसतो


मनातील त्या पावसाला आवडते

चिंबचिंब भिजवायला हे तनमन 

ऐकता त्याचे दुःख होतात भावूक

ढाळून दोन अश्रू सोडतात सारेजण


म्हणून मनातील तो पाऊस आजही

तसाच अव्यक्त कोपऱ्यात दडलाय 

घेईल समजून कोणीतरी या आशेवर

तो आज धो धो कोसळून पडलाय


त्याला न ठाव काय आता होणार आहे

तरीही तो साऱ्यांच्या मनी आनंद भरतो 

कुणी होवो अथवा न होवो आपले तरीही

केल्या उपकारांची तो जाणीव धरतो !


Rate this content
Log in