STORYMIRROR

Anita Gujar

Others

3  

Anita Gujar

Others

मनाच्या धुंदीत

मनाच्या धुंदीत

1 min
234

मनाच्या धुंदीत चांदण्या राती

साजणा बोलव मला,

घेऊनी कवेत थंड या हवेत

झुलव चांदण झुला||


गुलाबी थंडीत अंगाला झोंबतो

बेधुंद असा गारवा,

अशाच वेळी मनी घुमतो

इश्काचा ग पारवा ||


जन्मोजन्मीचे नाते आपुले

अंतरु नको रे मला,

अर्ध्यावरी डाव मोडुनी गेला

गुन्हा काय मी रे केला||


Rate this content
Log in