मनाचं लाॅकडाऊन
मनाचं लाॅकडाऊन
1 min
11.8K
कधी कधी आयुष्याच्या वळणावर आपल्या मनाला समजाव लागते...
दुसऱ्याच्या मनासाठी आपलं मन मारावे लागते...
ओठी आलेल्या शब्दांना गुपचूप गिळावे लागते..
दूसऱ्याच्या सुखासाठी आपलं दुःख विसरावे लागते
रडु येणारे अश्रू थांबवून चेहऱ्यावर हसू आणावे लागते...
भांडणं तंट्याच्या सुटकेसाठी आणि शांतीसाठी
खरंच कधी कधी मनाला पण लाॅकडाऊन करावं लागते
