STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

मनाची मशागत

मनाची मशागत

1 min
133

मनाची मशागत

खरच करूया

सुख समाधानाचे

खत मनी घालूया


चांगलेच विचार

मनी सदा आणूया

सुखाचे घोट आपण

नित्य नवे घेवूया


चांगल्या आचारांचे

बीज मनी पेरूया

वाईटाचे सारे विचार

मनी काढून टाकूया


खरे तेच बोलूया

हे मनाला सांगूया

खोटे कदापी नको

मनी सर्व ठसवूया


करू अशीच छान

मशागत मनाची

वृद्ध थोरांना आपण

नित्य जपण्याची


Rate this content
Log in