Savita Kale

Others


3  

Savita Kale

Others


मनाचा ठाव ना ठिकाणा

मनाचा ठाव ना ठिकाणा

1 min 13 1 min 13

सैरभैर मन हे

सैरभैर भावना

चंचल या मनाचा

ठाव ना ठिकाणा।। 


वा-याच्या वेगाने 

सुसाट ते पळते

क्षितिजाला स्पर्शून

क्षणात माघारी येते।। 


लहानग्या बालकासम

हट्ट कैक करते

हव तस न झाल्यास

खुळ्यावानी रडते।। 


मृगजळामागे कधी

खूप ते धावते

स्वप्नांच्या दुनियेत

रात रात जागते।। 


काय हवं त्याला

त्याचे त्यालाच समजेना

चंचल या मनाचा

ठाव ना ठिकाणा।। Rate this content
Log in