STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

4  

Sushama Gangulwar

Others

मनाचा पिंजरा

मनाचा पिंजरा

1 min
337

मन नसते पिंजरा पण बनवलेले बरे 

सैरा वैरा धावताना मनाला अडवलेले बरे.....


चंचल मनाचे खेळ वेळेवर थांबवलेले बरे 

अशांत मनाला शांततेत कैद केलेले बरे 


कधी कधी एकांतात मनाशी बोललेले बरे 

मनातील विचारांचा गुंता स्वतः सोडवलेले बरे 


मनात असतात अनंत इच्छा त्याचे न ऐकलेले बरे 

कधी कधी युक्तीने त्याला पिंजऱ्यात डांबलेले बरे


मन उधाण वा-याचे पण सीमेतच उडालेले बरे 

आनंदाने हसता हसता कधी रडलेले ही बरे


रिकाम्या मनाला कुठेतरी गुंतवलेले बरे 

सैतानाचे घर बनण्या पासून वाचवलेले बरे 


नकारात्मक विचारांपासून लांब ठेवलेले बरे 

सकारात्मक विचारांना मनात वाव दिलेले बरे 


मनाला एकाग्र ठेवण्याचे प्रयत्न केलेले बरे 

सुखकर आयुष्यासाठी कुठेतरी थांबवलेले बरे 


आता बस झाले तुझे, माझे ऐक असे म्हटलेले बरे 

तू पुढे की मी पुढे, दोघे संगतीत चाललेले बरे 


पूर्णतः मनाच्या स्वाधीन होण्या आधी सावरलेले बरे 

मन बेधुंद लाट होण्या आधी त्याला कैद केलेले बरे


कधी कधी खंबीरपणे मनाच्या विरुध्द झालेले बरे 

मानसिकतेचा विकार होण्या आधी समजावलेले बरे



Rate this content
Log in