मनाचा दिवा...
मनाचा दिवा...
1 min
184
त्याला पाहताच तेवला मनाचा दिवा ,
फडफडतो तू ओझर होता मनाचा दिवा ...
तेल प्रेमाचे ओतले काठोकाठ भरले तुडुंब ,
निरंतर अखंड देव्हाऱ्यात ठेवला मनाचा दिवा...
आनंद होत नाही का तुला पाहुन दिवा माझा,
प्रेमाने ओलावते वात लख्ख प्रकाशमय मनाचा दिवा...
वाऱ्याशी लढतो पुन्हा तेवतो स्थिर राहतो बघ,
प्रेमाची विश्वासाची नाती जपतो मनाचा दिवा...
सकारात्मक ऊर्जेचा विश्वास उत्साहाची लाट ,
भक्तिमय जीवन अध्यात्माचा राग मनाचा दिवा ...
