STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

मन

मन

1 min
262

मन हे आपल्याला

त्याच्या तालावर नाचवतो

त्याच्या इच्छेप्रमाणे झाले की

आपल्याला हसवतो


चंचल आपले मन असते

बदनाम मात्र आपण होतो

मन जे जे सांगेल ते

आपण नेहमी करत असतो


मनाला समजूत घालायची

हिम्मत आपल्यात नसते

कितीही समजूत घातली

तरी किंमत त्याला नसते


मृगजळामागे धावायची

सवयच त्याला असते

योग्य काय, अयोग्य काय?

कळत त्याला नसते


मनावर अंकुश ठेवण्याचे

सामर्थ्य आपल्यात असावं

प्रत्येकवेळी मनासारखं

वागणं आपलं नसावं


Rate this content
Log in