मन
मन

1 min

181
मन पाखरू
त्याला कशी आवरू
धावतय सारखंच कशी सावरू....
मन
गतकालात जातेय
धाव धाव धावतेय
स्मृतीचे गंध छान अनुभवतेय...
मन
कधी रडते
कधी हसते, आनंदते
आठवणी अंतरी कप्प्यात उलगडते....
मन
हळूच उडते
ह्रदयातून खूश होते
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर छान झुलते...
मन
फारच खेळकर
चतूर, मोहक, चंचल
ध्येयवेडे, निरीक्षक तरीही खोडकर....