STORYMIRROR
मन
मन
मन
मन
मन माझे
घेई धाव
वाऱ्यासंगे
भरधाव...१
भटकते
सैरवैर
होई मग
सैरभैर...२
आवरणे
नसे शक्य
जखडणे
नसे मान्य...३
हे आकार
शून्य मन
भावनेने
व्यापे तन...४
आयुष्याची
आठवण
मन करी
साठवण...५
जपू या ते
हृदयात
ठेवू सदा
तारुण्यात...६
More marathi poem from Manisha Vispute
Download StoryMirror App