STORYMIRROR

Pradnya Sonali Dhamal

Others

4  

Pradnya Sonali Dhamal

Others

मन

मन

1 min
467

मन कधी कधी मन म्हणते जा एखाद्या शांत ठिकाणी

जिथे नसतील तुला डिस्टर्ब करणारे कोणी


येतो ना कधी कधी कंटाळा खूप साऱ्या कामाचा

वाटतो हवा हवा सा एकांत जरासा वाटते हट्ट पुरवावा कधीतरी मनाचा


केला विचार आणि गेले मंदिरात

पण येत होता आवाज सारखाच घंटेचा


मग गेले बागेत छान फुलांच्या

पण तिथे पण येत होता आवाज मुलांच्या खेळण्याचा


मना सांग मी तुला कुठे नेऊ

तुझा हट्ट मी कसा पुरवू


एकाच जागी मिळेल शांती

आत्मा सोडेल देहाला अंती


म्हटलं बघावं तरी जाऊन शेवटच्या ठिकाणी

मन म्हटले थांब जरा आधी हातात घे लेखणी


हसू मला आवरेना मनाचे माझे पटेना

म्हटलं चल तुझा हट्ट पुरवते ते म्हणतेय तुझी जिद्द मला बघवेना


खरं सांगतो ऐक तू नेहमीच असतेस शांत

कसं जमत तुला हे नाटक


मनातून असतेस गोंधळलेली तरीही

हसतेस अगदी निरपेक्ष


म्हणून सांगते तुला मना नको करू मला दंग

फक्त तुलाच कळतात माझ्या अंतरीचे रंग


Rate this content
Log in