STORYMIRROR

vanita shinde

Others

4  

vanita shinde

Others

मन

मन

1 min
527

आयुष्याचा सुत्रधार हे

मन इवलेसे वाटणारे,

कडू गोड आठवणींचे

भांडार ते साठणारे..


भल्या बु-या वळणावरती

चालताना दाखवते वाट,

कधी स्थिर, कधी चंचल

करते हे मन अबोल गोंगाट..


एकटेपणाला सावरण्यास

बनते ते खंबीर आधार,

सुख-दु:खाच्या हरक्षणात

मनच असते भागीदार..


रखरखणा-या वेदनांनाही

मन कुरवाळते प्रेम स्पर्शाने,

घालूनी फुंकर देते गारवा

दु:खालाही क्षमविते हर्षाने..


मानवाच्या जीवनातील

जगण्याची आस हे मन

हारलेल्या माणसाच्या

मृत्युचे दुसाहस हे मन..


Rate this content
Log in