STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

मन तळ्यात मळ्यात...

मन तळ्यात मळ्यात...

1 min
14

मन भलतेच व्दाड

त्याची काय सांगू बात

सदा खेळतच राही

खेळ तळ्यात मळ्यात


त्याला पाहता पकडू

पळू लागे दूर दूर

कशी समजावू त्याला

जिवा लागे हुरहूर


कधी वाटते मलाही 

त्याने बसावे निवांत 

थांब थांब ना रे मना

राहू दे ना मला शांत


कधी भरारी मारते

उंच उंच आभाळात 

भर्रकन जाते कधी

खोल खोल पाताळात 


निवांतशा अशा क्षणी

जुन्या जुन्या आठवणी 

आठवता डोळा माझ्या

आपसूक येते पाणी 


कधी घेऊनिया जाई

मला थेट बालपणी

आठवते बालपण 

हुंदडणे ते अंगणी


दिन सरले सरले 

फक्त सोबत मनाची

जरी तळ्यात मळ्यात 

मजा भारी या खेळाची



Rate this content
Log in