मन मोराचा पिसारा फुलला
मन मोराचा पिसारा फुलला
आले नभी ढग दाटून ,
तुझ्या येण्याची वर्दि घेऊन
ग्रीष्मात होरपळलेल्या धरणिला
लागली सुखाची चाहुल
मग थेंबानी येणे केले
पर्णावरति मोति साठले
मृदेच्या गंधाने मन मोहरून गेले
आल्या आल्या सरीवर सरी
धुवून निघाली मरगळ सारी
फुलकित झाली झाडेवेली
इंद्रधनुचे दर्शन झाले
नभाचे नशिब पालटले
थुई थुई मयुर नाचु लागले
पक्ष्यांची झाली गर्दि
पावश्यानेही दिली वर्दि
गुंजन पक्षी सख्यां संग करिती
फुलकित झाली सारी सृष्टी
मन मोराचे पिसारे फुलती