STORYMIRROR

Aruna Garje

Others

2  

Aruna Garje

Others

मन एक सवंगडी

मन एक सवंगडी

1 min
73

चाले मनाचा मनाशी 

एक सुखद संवाद 

नाही कुणी प्रतिवादी 

नाही कुठलाच वाद


थांब घडीभर मना

नको होऊ रे बेताल 

तुझे धावणे वेगाने 

होती जिवाचे या हाल


अरे! ऐक ना जरासा 

थांब थांब पळभर

बंद पापणीच्या आड

स्वप्न दडले सुंदर 


वेड्या मना धाव तुझी

साता समुद्राच्या पार

भारी शिणले मी आता

विसावते क्षणभर


बालपण आठवते

काही शोधू रे पाहते

झुले उगाच हिंदोळा 

मन झुलत राहते


आज तुझ्याविन मना

मज सखा ना सोबती

तुझ्या संगती सरती

माझ्या दिस अन् राती


मन वाटे कधी माझे

आहे एक बंद कुपी

सुख दुःख तिच्यामधी

सारे दडुनी राहती


मला वाटते आताशा 

मन एक सवंगडी

अनमोल अशी साथ

मनाचीच हरघडी


Rate this content
Log in