मन एक गाभारा
मन एक गाभारा
1 min
314
मन हेलकावे खात खात
हृदयाच्या काठावर येऊन थांबत
तेंव्हा काठोकाठ भरून आलेले डोळे
नकळत अश्रूंना वाट मोकळी करून देतात,
मग ते हेलकावे खाणार मन शांत होतं
अगदी नदीकिनारी उभ्या असलेल्या होडीप्रमाणे
आणि गलबत म्हणून वापरलेल हृदय
विसावतं अलगद मनाच्या खांद्यावर
तेंव्हा ती सगळी स्पंदनं साथ देतात हृदयाला सावरण्यासाठी!!
