मन बालपणात जाई
मन बालपणात जाई
1 min
261
पडतो मार
तुटते पट्टी ,
तरी जास्तीत
जास्त मस्ती
आला पाऊस
सोडू होड्या,
वह्या फाडूनी
थोड्या थोड्या
होवो खोकला
वाहो नाक,
चिंचा बोरं
मटकून टाक
लागो माती
मळो अंग,
खेळण्या मध्ये
सतत दंग
सांगता अभ्यास
कारणं फार,
मिळता संधी
होऊ पसार
नको जेवण
पाहिजे खाऊ,
मिळेपर्यंत
रडत राहू
चॉकोलेट चांदी
दगड गोटे ,
बालपणीचे
खजिने मोठे
आईस क्रीम वाला
येता दारी ,
चालू परीक्षा
तरी निघाली स्वारी
तेंव्हा होती
मोठे व्हायची घाई,
आता मन मागे
बालपणात जाई
