मम्मा
मम्मा
मम्मा तुझ्या पोटी येऊ का
तुझ्या उदरातून मी जन्म घेऊ का
तुझे स्वरूप घेऊन मी जन्म घेवू का
पप्पांचे प्रारूप होवून मी जन्म घेवू का
तुझ्यासारखे वात्सल्य, ममता अंगीकारून येऊ का
तुझ्यासाठी प्रेम, ममता, भावना घेऊन येऊ का
तुझे जगणे राहिलेले तूला माझ्यातून जगू देवू का
तुझ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यास जन्म घेवू का
तुझ्यासोबत बोबडे बोल बोलण्यास मी येऊ का
तुझ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्म घेवू का
तुझ्यातल्या तू ला सिद्ध करण्यासाठी मी येवू का
तुझं अस्तित्व प्रूफ करण्यासाठी मी जन्म घेऊ का
तुझा वागण्यात मूर्खपणा नाही सांगण्यासाठी येऊ का
तुझी अक्कल गुडघ्यात नाही सांगण्यासाठी मी येऊ का
तू बावळट नाहीस तुला सिद्ध करण्यासाठी मी येऊ का
तुझे प्रेम मिळवण्यासाठी प्रेमाला जपण्यासाठी येऊ का
तुझ्या ममतेच्या बदल्यात तुला ममता देण्यासाठी येऊ का
