मला तेव्हा जाग आली...
मला तेव्हा जाग आली...
डोळ्यांत स्वप्न भिजता रात्र जागवुनी गेली ,
निथळून गाली ओघळता मला तेव्हा जाग आली ...
आसमंत निजला चांदण्या रात्रीच्या उराशी ,
कवडसे चंद्राचे पापण्यावर मला तेव्हा जाग आली ...
स्वप्नातली रातराणी गंधाळून मनास गेली,
मन सुगंधाने नाहता मला तेव्हा जाग आली...
काजव्यापरी चमकते स्वप्न मनात लपून बसली,
एकांती आठवांच्या भेटता मला तेव्हा जाग आली...
हळूच शब्द ऐकता काव्यसर कशी बरसून गेली,
छंद माझा कागदावर उमटता मला तेव्हा जाग आली...
सखा सोबती तो त्याच्यासवे सप्तपदी चालली,
घेतला उंच झोका मनीषेने मला तेव्हा जाग आली ...
