मला काय आवडतं
मला काय आवडतं
1 min
229
मला आवडतं लिहायला
इवल्या चिमणपाखरांवर
नाजूक कोमल फुले पाने
रंगीबेरंगी फुलपाखरांवर
जाणून घेतेच सृष्टीसौंदर्य
निसर्गावर लिहिते कविता
आवडते रेखाटायला मला
पर्वत डोंगर सागर सरिता
लिहिते मी दोन सुंदर शब्द
देवाने दिलेल्या आरोग्यावर
भक्त आहे मी देव-देवतांची
लिहिते मुनींच्या वैराग्यावर
नको ओझे ताण-तणावाचे
आवडे मज स्वच्छंद जीवन
लिहिते मी व्यायामप्रकारावर
टिपण्णी देईल सर्वां संजीवन
गुंफते प्रभातीच्या चारोळ्या
पुजूनी तांबूस सूर्यनारायण
जो देतो ऊब प्रकाश जीवन
करूनी महतीचे पारायण
