मकरसंक्रांति
मकरसंक्रांति
1 min
453
मी आहे सण खासा
जानेवारी महिन्याचा
शेतीशी संबंध माझा
सौर वर्षातील पौषाचा.
राशिशी निगडित हे
स्त्रीलिंगी माझे नाव
दरसाल चढतो मग
कुंभारदादाचा भाव.
बायकांची खास मी
उखाण्यांचा आहे मान
सुगड्यांमध्ये भरून
धान्याचे देतात वाण.
काळी साडी नववधूला
अन् हलव्याचे दागिने
साऱ्यांसाठी पतंग नि
बालकांचे बोरनहाणे.
मी येता म्हणती सारे
तिळगुळ घ्या गोड बोला
नाव माझे सोपे किती
सांग ना आता तू मुला.
