STORYMIRROR

Sonam Thakur

Others

4  

Sonam Thakur

Others

मकर राशी

मकर राशी

1 min
68

शांत सुसर जरी ती भासे

स्थितीचा आढावा घेत असे

पृथ्वी तत्व असे जीचे

नाव या राशीचे मकर असे


मकर असे कष्टाची

शोषिक श्रमिक वृत्तीची

नडायला तिला जाऊ नका

गाठ राहील जन्मभराची


स्वकर्तृत्वावर उभी मकर

लाचारी रक्तात नाही

सरळ स्पष्ट व्यक्तिमत्व

अन्यायाला इथे थारा नाही


मित्रांच्या हाकेला तत्पर मकर

सोडून सर्व काही राहते हजर

त्यांच्या लोकांना त्रास दिला

तर मार्मिक हल्ला करते मकर


निराशेची गडद छाया चिरून

भाग्य उजळते स्वतःचे 

शून्यातून विश्व निर्माण करण्याची

क्षमता मकरेला चांगलीच जमते


Rate this content
Log in